त्याग आणि बलिदानाचा सण: ईदउल अजहा
प्रिय भारतीय बंधु आणि भगिनींनो,
आपला भारत देश हा विविधतेने नटला आहे.इथे वेगवेगळ्या धर्माचे, पंथाचे लोक गुण्यागोविंदाने एकत्र रहातात आणि आपले सण उत्सव आप आपल्या परीने साजरे करतात परंतु आज सुद्धा आपल्या समाजा मध्ये एकमेकांच्या सणा बद्दल गैर समज /समजुती आहे.
याच सर्वांत जिंवत उदाहरण म्हणजे ईदउलअजहा (बकरी ईद )नेमकी काय असते..? का साजरी केली जाते..? या बद्दल खूप भ्रामक संकल्पना आहे त्या दूर करून वास्तविक ईदउलअजहा समजुन घेऊ या.
मित्रांनो इस्लाम धर्मात फक्त दोनच धार्मिक सण आहे. जे पूर्ण विश्वात एकाच वेळी साजरे केले जातात एक म्हणजे ईदउलफित्र (रमजान ईद) आणि दुसरी म्हणजे ईदउलअजहा (बकरीद) आता आपल्या कडे जे बकरी ईद म्हणतात तो वास्तविक चुकीचा प्रकार आहे या सणाचे खरे नांव ईद-उल -अजहा आहे .
▪️प्रेषित इब्राहिम यांचा परिचय..?
ऐतिहासिक तथ्यांच्या आधारे कुर्बानी परंपरेचा इतिहास 4000 वर्षां पूर्वीचा आहे. अब्राहम नावाच्या प्रेषितांनी बुद्धपूर्व 1500 वर्षा पूर्वी ही कुर्बानी सुरु केली. इस्लाम मध्यें यांचा गौरव “राष्ट्राचे पिता “म्हणून करतात. तसचे जागतिक धर्म ज्यू, ख्रिस्ती आणि इस्लाम या तिन्ही धर्मां मध्ये अब्राहाम अल्लाहचे प्रेषित म्हणूनच़ मान्य आहेत. तसेच काही हिंदू धर्म मध्ये देखील अब्राहमचा यांचा उल्लेख “अभिराम” या नावाने करतात.या बाबत मुस्लिम विद्वान सहमत नाही.
▪️प्रेषित अब्राहम यांची सामाजिक सुधारणा.
त्या काळी असलेल्या असंख्य कू प्रथा जे मानवजातीला काळीमा फासविणाऱ्या होत्या त्या प्रेषित अब्राहमनीं दूर केल्या .त्या पैकी एक प्रथा होती नरबळी.! ही फार भयंकर प्रमाणात जनसामान्या मध्ये ही प्रथा प्रचलित होती या मध्ये मनुष्याची बळी दिला जाई.या नरबळी ला अल्लाह ने प्रेषित अब्राहम यांच्या द्वारे ही प्रथा बंद केली आणि त्या जागी पशूंची कुर्बानी देण्याची नवीन परंपरा मानवजातीला दिली. आणि भविष्यात होणाऱ्या नरबळी प्रथेचा नायनाट केला.
▪️कुर्बानी म्हणजे ईश्वरा ठाई त्याग आणि समर्पण
जगा मध्ये अनेक प्रकारचे सण,उत्सव साजरे होतात. त्या सणाला समाज मान्यता भले काहीही असो परंतु ते साजरे होतातच जसे फ्रांस, स्पेन, मध्यें लाखो टोमॅटो पायाखाली तुडवून नासाडी केली जाते. आणि काही सणा मध्ये दारू,नशा करून नुकसान केले जाते ज्या मध्ये कोणत्याच प्रकारचा फायदा होत नाही. परंतु कुर्बानी हा वेगळा सण आहे .या मध्ये आपल्या जीवापाड पाळलेल्या प्राण्यांची कुर्बानी देऊन त्याग आणि बलिदानाचा उत्सव आहे. या द्वारे मनुष्याला आपल्या जीव प्रिय पशु ची कुर्बानी देऊन ईश्वराच्या आदेशा समोर प्राण सुद्धा कुर्बान करू ही ईच्छा निर्माण होते .
▪️कुर्बानी चा उद्देश….
पवित्र कुरआन मध्ये कुर्बानी संदर्भात अल्लाह सांगतो..
“अल्लाह जवळ नाही तुमच्या प्राण्यांच मास नाही रक्त जाते अल्लाह जवळ परंतु तक्वा (ईश भय) पसंत आहे”.
म्हणजेच स्पष्ट आहे की फ़क्त प्राण्यांची बळी देऊन अल्लाह खुश होत नाही तर मनुष्याच त्याग आणि ईश्वरा समोरील समर्पण आवश्यक आहे. कुर्बानी जो व्यक्ती देतो तो त्या प्राण्यांचे 3 भाग बनवितो एक स्वतःसाठी दुसरा त्यांच्या नातेवाईकांसाठी आणि तिसरा भाग गोरगरिबां साठी. म्हणजेच कुर्बानी होणाऱ्या पशु चा योग्य वापर होतो आणि ज्या लोकांना वर्ष भर मटन आर्थिक परिस्थिती मुळे मिळत नाही त्यांना कुर्बानी द्वारे व्यवस्था करण्यात येते.
▪️कुर्बानी द्वारे आर्थिक आणि सामाजिक व्यवस्था.
इतर सणा प्रमाणे ईदउलअजहा फक्त एक परंपरागत सण नव्हे तर या द्वारे सामाजिक आणि आर्थिक व्यवस्था कायम होते सामाजिक व्यवस्था याकरिता कारण कुर्बानी ज्याच्या घरी असते त्या पशुचा हिस्सा (भाग) स्वतः सारखाच दुसऱ्यांना सुद्धा दिला जातो त्यात भेदभाव न करता सर्वांना समान समजून हिस्सा देण्यात येतो तचेस ज्या लोकांना वर्ष भर खाण्या करिता मिळत नाही त्यांना त्यांच्या घरी जाऊन सन्मानाने कुर्बानी चा भाग दिला जातो. तसेच त्या पशुचीं खरेदीआणि विक्री या करिता शेतकरी बंधुना तसेच जण सामान्य लोकांना आर्थिक फायदा होतो म्हणजे सण फक्त परंपरा नसून आर्थिक आणि समाजिक व्यवस्था प्रस्थापित करणारा आहे.
▪️भारतीय समाजातील गैर समज.
मित्रांनो आपल्या समाजात काही समाजकंटक लोक कुर्बानी बद्दल अनेक गैरसमज पसरवितात आणि समाजा मध्ये द्वेष निर्माण करतात वास्तविक आपल्या देशात पशु बळीचे अनेक धार्मिक सण होतात.ते पशु तर वापरा मध्ये न येता फक्त बळी म्हणून वापरतात तसेच दररोज लाखो टनाने मास विकले जाते. परंतु फक्त कुर्बानी च्या दिवशीच प्राणी प्रिय होतात या द्वारे स्पष्ट होते की एका समाजाच्या धार्मिक मूलभूत अधिकार काढण्यासाठी केलेले प्रयत्न होय.कारण देशाच्या राज्यघटने नुसार प्रत्येकाला आप आपल्या धर्मावर अमंलबजावणी करण्याची सूट दिली आहे.
म्हणून माझ्या प्रिय भारतीय बंधू आणि भगिनीनों आपण सर्वांनी या त्याग आणि बलिदानाचे प्रतीक असलेल्या ईदउल अजहा सणाला मोठया आनंदाने साजरा करून अल्लाह समोर प्रार्थना करू या कि आम्हाला या करोना च्या महामारी पासून मुक्ती दे आणि सम्पूर्ण विश्वामध्ये शांती आणि समृद्धी प्रदान करो, धन्यवाद.
प्रो.सलमान सय्यद शेरू, पुसद
9158949409