हज़रत उमर फारूक(र.अ) उर्दू हायस्कुल ची यंदा सुद्धा उत्तुंग भरारी
पुसद, दिनांक 6 ऑगस्ट
पुसद शहरातील उर्दू माध्यमातील सुप्रसिद्ध शाळा हजरत उमर फारूक (र.अ) उर्दू हायस्कूल ने यशाची परंपरा कायम ठेवून या वर्षी सुद्धा उत्कृष्ठ 99 टक्के निकाल दिला आहे. या मध्ये कु.तजीन फिदोस समीर खान या गुणवंत विद्यार्थीनी ने 95 टक्के घेतले तर मो.फुर्कान मो.इर्फान देशमुख याने 91% घेऊन यशाची भरारी घेतली आहे.
सोबतच एकूण निकाला मध्ये उच्च श्रेणीत 46 विद्यार्थी आले असून एकूण विद्यार्थ्यां मध्ये 66 विद्यार्थी हे प्रथम श्रेणीत आले आहे. व द्वितीय श्रेणीत 50 विद्यार्थी आले आहे. शाळेतील एकूण 168 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून. एकूणच निकाल 99 टक्के लागला आहे. या यशाचे श्रेय शाळेचे मुख्याध्यापक मो. वकील सर,व एजाजोद्दीन खतीब सर आणि वर्ग शिक्षक अब्दुल करीम सर,फहिमोद्दीन मलनस सर,निसार अहेमद सर तसेच सहाय्यक शिक्षक नवेद अहेमद सर,इर्फान अहेमद खान सर, नौशाद हुसैन सर, नदीम खान सर,सिमान मुद्दसिर सर, शेख इर्फान सर, अनस सर, सय्यद सलमान सर उमेर मिर्झा, मो.जुनेद सर या सर्व शिक्षकांना श्रेय जाते. तसेच शाळेतील शिक्षेत्तर कर्मचारी यांनी सुद्धा मोलाचे सहकार्य केले. म्हूणूनच या उत्कृष्ठ निकाला नंतर सर्वी कडूनच शाळेचे कौतुक होत आहे.