मिलादून्नबी विशेष प्रेषित मुहम्मद(स) सर्वांसाठी। प्रेषित मुहम्मद (स.) यांचे अंतिम प्रवचन (हज्जतुल विदा)
रिपोर्ट प्रा.सलमान सय्यद, पुसद
(मराठी भषिकां साठी मराठी भाषांतर)
बंधुनो, मी आज सांगतो ते ऐका, कारण आणखी एखादे वर्ष मला लाभेल असे वाटत नाही. या जागी पुन्हा तुमच्यात मी दिसेन, वावरेन, बोलेन असे वाटत नाही. हा आजचा दिवस व हा महिना जसा सर्वांना पवित्र वाटतो त्याप्रमाणे सर्वांचे जीवन व मालमत्ता पवित्र माना।
तुम्ही एकमेकांचे जीवन पवित्र माना, एकमेकांना सांभाळा. अल्लाह समोर जाण्याची वेळ येईपर्यंत असे प्रेमाने व बंधु- भावाने वागा. कोणाच्या प्राणांचा वा घरादारांचा नाश करू नका. एके दिवशी अल्लाहच्या न्यायासना समोर उभे रहावयाचे आहे हे कधीही विसरू नका. त्या दिवसाची नेहमीआठवण ठेवा. तेथे कृत्यांचा हिशोब द्यावा लागेल. तुमचा आमचा सर्वांचा ईश्वर (अल्लाह) एकच आहे आपण सर्व आदम (अलै.) चीच संतान आहोत।
मित्रांनो, पतीचे पत्नीवर काही हक्क आहेत तसेच पत्नीचेही आहेत. आपल्या बायकांना प्रेमाने व सहानुभूतीने वागवा. कठोर होऊ नका. दयाळू रहा. अल्लाहच्या जामिनकीवर आपल्या पत्नीचा स्वीकार केलेला असतो, खरं ना?अल्लाहच्या शब्दाने त्या तुमच्या कायदेशीर भार्या झालेल्या असतात ही गोष्ट विसरू नका।
तसेच तुमच्या वर कोणी विश्वास टाकला तर विश्वासघात करू नका. दिला शब्द पाळा. सावकारी निषिद्ध आहे आणि तुमचे गुलाम त्यांना नीट वागवा. तुम्ही जे खाल ते त्यांनाही खायला द्या. तुम्ही जसे कपडे घालाल तसेच त्यांनाही द्या. लक्षात ठेवा की कसे ही झाले तरी ते अल्लाहचे बंदे आहेत. त्यांना कठोरतेने वागवू नये। मित्रांनो,माझे शब्द ऐका, नीट समजून घ्या, सारे मानव एकमेकांचे भाऊ आहेत हे कधीही विसरू नका.जात, पात, वर्ण, वंश, गोरे, काळे, सर्व माणसे समान आहेत. कोणीही कोणा पेक्षा श्रेष्ठ अथवा कनिष्ठ नाही. तुमचे सर्वांचे एक जणू भातृमंडळ, एक तुमचा महान भातृसंघ. जे दुसऱ्यांचे आहे ते त्याने स्वेच्छेने, खुशीने दिल्या शिवाय त्याला हात लावू नका।
खचितच माझ्या मागे अल्लाहचा ग्रंथ कुरआन आणि माझ्या शिकवणी हदीस तुमच्यात सोडून जात आहे. ते जर मजबूत धराल तर तुम्ही कधीही भटकणार नाही।
“जे येथे आज हजर आहेत त्यांनी हे सारे गैरहजर असणाऱ्यांना सांगावे. येथे ऐकणारा ही ज्याला सांगितले जाईल तो कदाचित ते अधिकच लक्षात ठेवण्याचा संभव आहे.” असे हे प्रवचन बराच वेळ चालले होते. साधे, सरळ, कळकळीचे, वक्तृत्वपूर्ण असे ते प्रवचन होते. भावना प्रधान श्रोत्यांची अंत:करणे उचंबळत होती, थरारत होती आणि प्रवचन संपल्यावर प्रेषितांनी पुढील शब्दांनी शेवट केला
“जे जे अल्लाहने मला सांगितले ते मी आपल्या पर्यंत पोहचवले आहे. याला तुम्ही साक्षी आहात.”लगेच लोकांनी पैगंबरांना उद्देशून म्हटले, “हो! आपल्या पर्यंत जे आले ते आपण आमच्या पर्यंत पोहचते केले आहे.” त्याच वेळी आकाशाकडे तर्जनी करून पैगंबर म्हणाले, “अल्लाह! हे लोक जे सांगत आहेत याची तू पण खात्री करून घे.” अर्थात अल्लाहने आपणावर जे सोपवलेले कार्य होते ते आपण पूर्ण केले
हज्जतुल विदा का खुतबा मराठी भाषांतर
जर आपल्या ला प्रेषित मुहम्मद (स) यांचे चरित्र वाचायचे असेल तर खालील मो.क्रमांक वर वॉट्सप करा।
प्रा.सलमान सय्यद, पुसद
9158949409