स्वातंत्र्य लढ्यातील मौलानांचे योगदान।

स्वातंत्र्य लढ्यातील मौलानांचे योगदान।

मौलाना अबुल कलाम आझाद।
(1888 ते 1958 )

इमामुल हिंद मौलाना अबुल कलाम आझाद। भारताचे एक महान सुपुत्र स्वातंत्र्य चळवळीचे सरसेनापती आणि एक महान हरहुन्नरी व्यक्तिमत्व होते.11नोव्हेंबर 1888मध्ये मक्का शहरात जन्म झाला.वडिलांचे नाव खैरुद्दिन होते जे एक प्रसिद्ध धर्मोपदेशक होते. मौलाना अबुल कलाम आझाद यांचे कला आणि संस्कृती वर त्यांचे प्रभुत्व होते. त्यांच्या भाषणात एक प्रकारची जादू होती. आपल्या भाषणाने आणि लेखणीने हजारो लाखोंच्या मनात स्वातंत्र्याची ज्योत त्यांनी जागविली. त्यांचे वृत्तपत्र’ अलहिलाल ‘ने देशाच्या कानाकोपऱ्यात स्वातंत्र्याचा बिगुल वाजवला. 1915 मध्येआपल्या राजनितिक कार्यामुळे बंगाल सरकारने त्यांना हद्दपार करून रांचीमध्ये नजर बंद केले .त्यानंतर स्वातंत्र्याच्या लढाईत अनेक वेळा अटक होत राहिली. मौलानांनी आपल्या आयुष्या तील जवळ जवळ सोळा वर्षे देशाच्या स्वातंत्र्या साठी तुरुंगात शिक्षा भोगली. सुरुवातीला जमियत उलमा ए हिंद। वर्किंग कमिटीचे सदस्य होते. लाहोर मधील मुख्य अधिवेशन 1921आणिकराचीचे अधिवेशन 1931 मध्ये काँग्रेस पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष होते. स्वातंत्र्यापूर्वी सात वर्षे काँग्रेसचे अध्यक्ष होते. त्यांच्याच नेतृत्वात ‘अंग्रेज भारत छोडो ( Quit India Movement 1942) आंदोलन चालवले होते. स्वातंत्र्यानंतर।

Maulana contribution to freedom movement.

देशाचे पहिले शिक्षणमंत्री झाले

मौलानांच्या राजकीय धार्मिकआणि ज्ञानावर इतके लिहिले गेले की ते सर्व एकत्र केले की , कित्येक पुस्तके तयार होतील .सन 1958 मध्ये मौलानांचा मृत्यू झाला._

संदर्भ : स्वातंत्र्य लढ्यातील मुस्लिमांचे योगदान।

प्रा.सलमान सय्यद, पुसद
९१५८९४९४०९

पसंद आई खबर, तो करें शेयर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *