काँग्रेसचे निदर्शन-देशात पेट्रोल, डिजेलच्या दरवाढी, मोदी सरकारचा विरोधात।
औरंगाबाद से अब्दुल क़य्यूम की रिपोर्ट।
औरंगाबाद प्रतिनिधी. सोमवारी आज सोमवारी सकाळी १० वा.औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर देशात झालेल्या अन्यायकारक पेट्रोल व डिझेल दरवाढीच्या विरोधात धरणे आंदोलन जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.आ.डॉ.कल्याण काळे व शहर व जिल्ह्या अध्यक्ष मोहम्मद हिशाम उस्मानी यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आले होते। धरणे आंदोलन झाल्यानंतर काँग्रेसच्या शिस्टमंडळाने जिल्हाधिकारी याना निवेदन दिले।
निवेदनात म्हटले आहे कि केंद्र सरकारने देशात मोठ्या प्रमाणात डिझेल व पेट्रोल दरवाढ केली आहे। त्याचा आर्थिक बोझा देशातील गरीब व सर्व सामान्य माणसांवर पडला आहे। सद्या कोरोना महामारी आजार, लॉकडाऊन, आर्थिक मंदी या सर्व कारणामुळे सामान्य जनता हैराण आहे। आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या बॅलरचे भाव कमी असतानासुद्धा केंद्र सरकारने दरवाढ केली आहे। ती कमी करण्यात यावी अन्यथा औरंगाबाद शहर, जिल्हा काँग्रेस कमिटी च्या वतीने आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल।
यावेळी जिल्हा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी चे उपाध्यक्ष प्रकाश मुगदिया औरंगाबाद जिल्हा काँग्रेस चे माजी अध्यक्ष अनिल पटेल, सेवादलाचे प्रदेश अध्यक्ष विलास बापू औताडे, शहर काँग्रेस कमिटीचे माजी शहर अध्यक्ष ईब्राहिम पठाण, नामदेव पवार, जिल्हा काँग्रेस चे सरचिटणीस, किरण पाटील डोणगावकर, मोहसिन अहेमद, युवक काँग्रेसचे जिल्हा शहराध्यक्ष मुजफ्फर पठाण, गुलाब पटेल, नदीम सौदागर, मुनिर पटेल, औरंगाबाद चंद्रभान पारखे, औरंगाबाद जिल्हा महिला काँग्रेस च्या अध्यक्षा सुरेखा पानखडे, औरंगाबाद शहर महिला काँग्रेस च्या अध्यक्षा सरोज मसलगे, डॉ.पवन डोगरे, संजय वाघमारे, कै़सर बाबा, अनिल मालोदे, डॉ.पटेल सरताज, आदीची प्रमुख उपस्थिती होती।