औरंगाबाद शहरात कॉग्रेसच्या कार्यकर्त्याची लॉकडाऊनमध्ये उल्लेखनीय कामगिरी।

औरंगाबाद शहरात कॉग्रेसच्या कार्यकर्त्याची लॉकडाऊनमध्ये उल्लेखनीय कामगिरी।

सतत दोन महिन्यापासून काँग्रेसचे शेख युसूफ मदत गरीबांना सुरू

औरंगाबाद शहरात कॉग्रेसच्या कार्यकर्त्याची लॉकडाऊनमध्ये उल्लेखनीय कामगिरी।
औरंगाबाद, 30 में 22 मार्च 2020 पासून देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने लॉकडाऊन केल्यानंतर कामगार, ऑटोचालक व हातावर पोट असणाऱ्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा मोठा प्रश्न औरंगाबाद शहरात निर्माण झाला होता. अशा संकटकाळी कॉग्रेसचे नेते शेख युसुफ गरजूंच्या मदतीला धावून आले. त्यांच्या नेतृत्वाखालील टिमने अहोरात्र परिश्रम घेत गरीबांची भूक मिटवण्याचा तीन महीन्यापासून प्रयत्न करत आहे. गरजूंना घरापर्यंत प्रसिध्दी न करता रेशन किट पोहचवने, परराज्यातील मजूरांना मदत केंद्रीत अथवा रेल्वेस्थानक व विविध ठिकाणी जेवणाची पैकीटे पोहचवणे, कम्युनिटी किचन निर्माण करुन शहरातील गरीब वस्त्यांमध्ये जेवन पाठवणे, गणेश कॉलनी वार्डात व शहरात गरजूंना रेशन किट, सँनिटायजरची फवारणी करणे असे महत्त्वाचे काम मागिल दोन अडीच महीन्यापासून अविरत सुरु आहे. लॉकडाऊन 0.5 मध्येही गरजूंना मदत करण्याचे नियोजन शेख युसुफ लीडर यांनी तयार करुन ठेवले आहे. त्यांच्या कामाची शहरात प्रशंसा केली जात आहे. कॉग्रेसचे दिग्गज लॉकडाऊनमध्ये गायब असले तरी यांच्या टिमने अहोरात्र परिश्रम घेत हजारो गरजूंची भूक मिटवण्याचा प्रयत्न केला आहे. परराज्यात आपल्या गावी जाण्यासाठी कामगारांना लागणारी मदत उपलब्ध करून दिली. कोरोना योध्दां डॉक्टर, नर्सेस, पोलीस कर्मचाऱ्यांचे गुलाबपुष्प देवून काम करण्याचा उत्साह वाढवला. शहर कोरोनामुक्त करण्यासाठी सोशल डिस्टनसचे पालन करावे, चेहऱ्यावर फेसमास्क लावावे, सँनिटायजरचा व हात वारंवार साबनाने धूवून घ्यावे, गर्दी करु नये, लॉकडाऊन, संचारबंदीचे पालन करावे यासाठी जनजागृती केली. त्यांना या पूण्याईचे कामात किसान कॉग्रेसचे प्रदेश सचिव अनिस पटेल, मा.जिल्हाध्यक्ष युथ काँग्रेसचे शेख अथर, शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष मुजफ्फर खान, शेख अरफात व कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.

पसंद आई खबर, तो करें शेयर