दौलताबाद येथील टाईम्स सोशल वेलफेअर ने केली गरीबांना मदत
दौलताबाद येथील गरजु व गरीब कुटुंबियांना लॉकडाउन 2आणि 3या काळात200कीट किराणा सामान वाटप।
औरंगाबाद प्रतिनिधी। दौलताबाद येथील टाईम्स सोशल वैलफेयर अॅण्ड चैरिटेबल ट्रस्ट च्या वतीने गरीब विधवा महिलांना किराणा सामान ची मदत दौलताबाद येथील टाईम्स सोशल वेलफेअर अण्ड चॅरिटेबल ट्रस्ट या सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सैय्यद लायकोद्दीन व दौलताबाद येथील दानशुर व्यक्तीच्या मदतीने दौलताबाद येथील गरजु व गरीब कुटुंबियांना लॉकडाउन 2आणि 3या काळात 200 कीट किराणा सामान वाटप करण्यात आले होते.त्यात शासनाकडुन लॉकडाउन 4 ची घोषणा झाली आणि गरीब कुटुंबियांच्या चिंतेत आणखी भर पडली होती.अशात अनेक मजुरांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला होता, बंद मुळे हाताला काम नाही यामुळे दौलताबाद येथील समाजसेवकांनी एकत्र येऊन या कुटुंबियांना पुनश्चा मदतीचा हाथ दिला. 70 विधवा महिलांना किराणा सामान वाटप करण्यात आले, विशेष म्हणजे कोणत्याही प्रकारचे फोटो सुद्धा काढलेले नाही या उपक्रमा मुळे बर्याच लोकांना दिलासा मिळाला आहे.सदरील कुटुंबियांची आर्थिक परिस्थिती फार बिकट आहे. दौलताबाद मध्ये 80%लोकं मजुरी करुन आपला उदरनिर्वाह करतात बर्याच लोकांना उपासमारीची वेळ येण्याची शक्यता आहे, या करीता अशा प्रकारची कोणी मदत करण्यास तयार असेल तर त्यांनी टाईम्स सोशल वेलफेअर अॅण्ड चॅरिटेबल ट्रस्ट या सामाजिक संस्थे मध्ये देणगी द्यावी असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष सैय्यद लायकोद्दीन,शेख मिन्हाज, शेख शकील, राहुल आठवले, वसीम खान, शेख फरीद, शेख जफर, शेख लाला, शेख अहेमद, फराज आबेदी, सैय्यद शफीक , सैय्यद बाबा, रीजवान खान, शेख फारुक, सैय्यद खलील, आरीफ पठाण, सैय्यद अजिम ,सी.ए.जुबेर, शेख मोहसिन, शेख हादी, मुबीन खान, आसिफ पटेल, एड.मोहसिन खान, नियाज शेख़, आदिंनी केले.