तंबाखू विरोधी दिनानिमित्य सलीम अत्तार यांनी चित्रातून केली जनजागृती।
३१ मे जागतिक तंबाखूविरोधी दिनानिमित्त जिल्हा परिषद प्रशाला बहिरगाव ता कन्नड चे कलाशिक्षक सलिम आत्तार यांनी तंबाखू विरोधी दिनानिमित्य चित्रकलेच्या पोस्टर मधून जनजागृती केली आहे.
तंबाखू मुळे कँन्सर सारखा महा भयंकर आजार जडतो,तंबाखूच्या विषारी निकोटीन सारख्या रसायनाने मुळी च्या माध्यमातुन फळे सुद्धा विषारीच येतात असे वर्णनात्मक चित्रातून संदेश दिला आहे.सिगारेट च्या सेवनाने फुप्फुसाचे आजार होतो हा ही संदेश दिला आहे .
तंबाखूच्या चक्रव्यूहातून युवकांना बाहेर काढून तरुणांना तंबाखू व निकोटीन वापरण्यापासून प्रतिबंधित करणे ही या वर्षाची जागतिक आरोग्य संघटनेची मुख्य संकल्पना आहे. तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन केल्यानंतर जवळपास याचा परिणाम म्हणून भारतामध्ये ५५०० युवक दर दिवशी पहिल्यांदा तंबाखूचे सेवन करतात. दर दिवशी भारतात तीन हजार पाचशे लोक केवळ तंबाखू सेवन केल्यानेच मरण पावत आहेत. ही खरंच चिंताजनक बाब आहे.
सलीम अत्तार यांनी ४फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिनानिमित्य प्रशालेत “एक पत्र व्यसनमुक्तीसाठी”हा उपक्रम राबविला होता.यात 300विद्यार्थांनी पालकांना,नातेवाईक यांना पत्रातून तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन करु नये अशी विनंती केली होती.यामुळे बरेच पालकांचा व्यसमुक्त झालेली आहेत.तसेच तंबाखूजन्य वस्तुची होळी ,रांगोळी स्पर्धेतून ,मेहंदी स्पर्धा ,चित्रकला स्पर्धेच्या माध्यमातून विविध संदेश देण्यात आला.गावात फेरीच्या माध्यमातुन जनजागृती करण्यात आली विद्यार्थ्यांना तबांखुमुक्ती शपथ देण्यात आली होती साहामाही परीक्षेत सुद्धा व्यसमुक्त होण्यासाठी संदेशात्मक चित्र देण्यात आले होते.
सलाम मुंबई फाऊंडेशन, आरोग्य विभाग महाराष्ट्र राज्य, शिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य आणि द युनियन यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरावरील दिनांक २८ मे रोजी ऑनलाइन वेबिनार संपन्न झाला होता.यात कलाशिक्षक सलिम अत्तार यांनी सहभाग नोंदविला होता .३१ मे जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त पोस्टरमधून व्यसनमूक्तीचे संदेश देण्यात आला आहे.
वरील कार्याबद्दल प्रशालेतील मुख्याध्यापक दिलीप महाजन व सर्व शिक्षक कर्मचारी आदिनी अभिनंदन केले.