शौचालय अनुदानाने मिळाली लॉकडाऊन काळात मदत।
ग्रामपंचायत दौलताबादच्यावतीने लाभार्थ्यांना शौचालयाचे प्रोत्साहनपर अनुदान
औरंगाबाद, दिनांक 02 जून : संपूर्ण देशभरात कोरोना या संसर्गजन्य रोगामुळे लॉकडाऊन करण्यात आलेले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील रोजगार उपलब्ध नसल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. ग्रामपंचायत दौलताबादच्यावतीने लाभार्थ्यांना शौचालयाचे प्रोत्साहनपर अनुदान देऊन लॉकडाऊन काळात आर्थिक मदत केली असल्याचे गट विकास अधिकारी एम सी राठोड यांनी कळविले आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ मंगेश गोंदावले यांनी अनुदान वाटपा बाबत दिलेल्या सूचनेप्रमाणे बेसलाईन मधून वगळलेल्या NLOB मधील 131 लाभार्थ्यांना प्रत्येकी 12 हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान म्हणून एकूण १५ लक्ष ७२ हजार रुपये धनादेशाद्वारे ग्रामपंचायत दौलताबाद च्या वतीने प्रत्येक लाभार्थ्यांना वाटप केले. लॉकडाऊन काळात हाताला काम नसल्याने ग्रामस्थांवर उपासमारीची वेळ आली होती या प्रोत्साहन अनुदानामुळे लाभार्थ्यांना आर्थिक मदत मिळाली आहे.
लाभार्थ्यांना सरपंच पवन गायकवाड ,उपसरपंच सय्यद इरफान ( शेरू), ग्रामविकास अधिकारी आर डी चौधरी यांच्या हस्ते धनादेश वाटप करण्यात आले तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये शौचालयांचे अनुदान तात्काळ वाटप करावे असे आवाहन जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ राम लाहोटी सहाय्यक गट विकास अधिकारी अनिल सिरसाठ, विस्तार अधिकारी पंचायत शिवाजी साळुंके यांनी केले आहे