फकीरवाडी हर्सूल येथे ५० गरजूंना अन्नधान्य वाटप।
औरंगाबाद दे अब्दुल क़य्यूम की रिपोर्ट।
औरंगाबाद. ०४-०६-२०२०. औरंगाबाद एजुकेशनल अँड वेलफेयर सोसायटी व कम्म्युनिटी पोलीसिन्ग (औरंगाबाद पोलीस) यांच्या वतीने फकीरवाडी हर्सूल येथे राहणाऱ्या ५० गरीब व गरजू लोकांमध्ये महिन्या भराचे राशन (किराणा सामान) वाटप करण्यात आले. या प्रसंगी घनश्याम सोनावणे (पी. आई. पुंडलिक नगर पोलीस स्टेशन, डॉ. किशोर उडाण (अध्यक्ष धवल क्रांती फौंडेशन) नोमान खान (औरंगाबाद फर्स्ट), सोहेल झकीऊद्दीन (अध्यक्ष औरंगाबाद एजुकेशनल अँड वेलफेयर सोसायटी), इमरान शेख (सचिव औरंगाबाद एजुकेशनल अँड वेलफेयर सोसायटी) यांची मुख्य उपस्थिती होती तसेच सोहेल अहमद, मोईज इकबाल, हाफिज हबीब पठाण, यासेर काझी, फाहद ममदानी, हाफिज अर्शद, मोहसीन बिन सालेम, शेख अमान व अयाज अहमद यांची या प्रसंगी विशेष उपस्थिती होती. या संस्थेतर्फे मागील तीन महिन्यामध्ये ११०० पेक्षा जास्त लोकांना किराणा सामान देण्यात आले आहे तसेच गेल्या ७५ दिवसापासून दर रोज १२०० गरीब व गरजूंना तयार जेवण हि देण्यात येत आहे. श्री. घनश्याम सोनावणे व डॉ. किशोर उडाण यांनी या कार्याबद्दल औरंगाबाद एजुकेशनल अँड वेलफेयर सोसायटी चे सर्व पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले.